मुंबई : मालमत्तेच्या वादातून दाम्पत्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना खार पोलिसांनी गजाआड केले. गोळीबाराची घटना काल मध्यरात्री अडीजच्या सुमारास खार पश्चिमेकडील अरोरा भवनात घडली. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलीस देतात.संजय पवार(४५) आणि शफी सय्यद(३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अरोराभवरातूनच अटक केली. अरोरा भवनचे मालक हरप्रीतसिंग अरोरा आणि त्यांच्या पत्नी सिंपा यांच्यावर आरोपी पवार, सय्यद यांनी गोळीबार केला. अरोरा हे अरोराभवनचे मालक आहेत. आरोपींनी अरोराभवनातली खोली स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी हरप्रीत व सिंपा यांना धमकावले होते. तसेच बळजबरीने त्यांच्याकडून कागदपत्रांवर सहया घेण्याचा प्रयत्न केला. त्यास नकार दिल्याने त्यांच्यावर गोळया झाडल्या. (प्रतिनिधी)
संपत्तीच्या वादातून दाम्पत्यावर गोळीबार
By admin | Updated: May 5, 2015 02:33 IST