Join us

चित्र स्टुडिओला आग

By admin | Updated: December 7, 2014 01:39 IST

पवई येथील चित्र स्टुडिओमधील सेटला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मोठी आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धावपळ करून अध्र्या तासात ही आग आटोक्यात आणली.

मुंबई : पवई येथील चित्र स्टुडिओमधील सेटला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मोठी आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धावपळ करून अध्र्या तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळते.
 च्चित्र स्टुडिओत गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. मालिका चित्रीकरणासाठी स्टुडिओत एक सेट उभारण्यात आला होता. नेहमीप्रमाणो सेटवर चित्रीकरण सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. 
च्बघता बघता संपूर्ण सेटने पेट घेतला. स्टुडिओतून आगीचे लोळ पाहून काहींनी पोलीस नियंत्रण कक्ष तर काहींनी अग्निशमन दलाला फोन केले. क्षणात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुढल्या काही मिनिटांत आग आटोक्यात आणून ती विझवली.
च्आग लागल्याचे समजताच मालिकेच्या चित्रीकरणात गुंतलेले कलाकार, तंत्रज्ञ सा:यांनीच पळत स्वत:चा जीव वाचविला. आग कशी लागली याची चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल करीत आहेत.