Join us  

Fire In Mumbai: ‘अविघ्न’च्या कामात अनेक अनियमितता?; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 7:10 AM

फ्लॅटधारकांनी आपापल्या सोईनुसार बांधकाम वाढवून  घेतले. इमारतीचा मूळ मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकाम यात त्यामुळे मोठी तफावत असल्याचे म्हटले जाते.

मुंबई : अविघ्न इमारतीच्या बांधकामात अनेक अनियमितता झाल्याची चर्चा आहे. बिल्डरने काम पूर्ण होण्यापूर्वीच फ्लॅट विकले. बांधकाम अपूर्ण सोडले. ज्यांनी हे फ्लॅट खरेदी केले त्यांनी आपापल्या सोयीनुसार बांधकाम करून घेतले. त्यामुळे सर्व फ्लॅटच्या बांधकामामध्ये एकसारखेपणा नाही. फ्लॅटधारकांनी आपापल्या सोईनुसार बांधकाम वाढवून  घेतले. इमारतीचा मूळ मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकाम यात त्यामुळे मोठी तफावत असल्याचे म्हटले जाते.इमारतीत  अग्निसुरक्षा पुरेशी नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे, या इमारतीमधील ५० टक्के फ्लॅट हे रिकामे आहेत.  जे ५० टक्के फ्लॅट विकले गेले आहेत, त्यांपैकीही २५ टक्के फ्लॅटमध्ये रहिवासी आहेत. उर्वरित रिकामेच आहेत. विकासकाने आजही इमारतीचा ताबा सोसायटीकडे दिलेला नाही. इमारतीची देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम विकासकाकडेच आहे.  दोन वर्षांपासून इमारतीची देखभाल-दुरुस्ती झालेली नाही. अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.