Join us

वांद्रे पूर्वेकडील सुप्रभात इमारतीच्या मीटर बॉक्सला आग

By admin | Updated: November 27, 2014 01:12 IST

सुप्रभात इमारतीमधील आगीची माहिती मिळताच काही क्षणांतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत: अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील विद्युत पुरवठा खंडित केला.

सुप्रभात इमारतीमधील आगीची माहिती मिळताच काही क्षणांतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत: अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील विद्युत पुरवठा खंडित केला. येथील विद्युत पुरवठा बंद केल्याने आसपासच्या परिसरातील वीजही गायब झाली. मीटर बॉक्सला लागलेली आग विझविताना जवानांनी इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि पाऊण तासात येथील आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
 
च्वांद्रे पूर्वेकडील सुप्रभात इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.