Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाडच्या पर्ल पॉलिमर कारखान्याला आग

By admin | Updated: November 23, 2014 22:56 IST

येथील औद्योगिक वसाहतीमधील पर्ल पॉलिमर्स लि. या कारखान्याला काल शनिवारी रात्री ११ च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कारखान्याचे सुमारे सात कोटी रु. हून अधिक नुकसान झाले आहे.

महाड : येथील औद्योगिक वसाहतीमधील पर्ल पॉलिमर्स लि. या कारखान्याला काल शनिवारी रात्री ११ च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कारखान्याचे सुमारे सात कोटी रु. हून अधिक नुकसान झाले आहे. पाच तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.काल रात्री तयार मालाच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत गोदामातील सर्व तयार माल पूर्णपणे भस्मसात झाला, तर मोल्ड डाय मशिनरी, स्पिंग मशीन, एएचयू सिस्टमसह प्लॅन्टमधील सर्व मशिनरीज या आगीत जळून खाक झाल्या. महाड एमआयडीसी महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणली. कारखाना पुढील बंदोबस्त होईपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती पर्ल पॉलिमरचे वरिष्ठ व्यवस्थापक सुदीप निवेतीया यांनी दिली. सुमारे ३५० हून अधिक कामगारांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. (वार्ताहर)