वसई : महानगरपालिका परिवहन सेवेच्या मुख्यालयासमोर एका नेलपॉलीश कंपनीमध्ये दुपारी ३.३० च्या सुमारास आग लागली. सुमारे एक तास ही आग धगधगत होती. या घटनेची माहिती देण्यासाठी अनेकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयात दूरध्वनी केले. परंतु, संबंधित विभागाकडून अर्धा तास प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.नवघर पूर्वेला महानगरपालिका परिवहन सेवेचे मुख्यालय आहे. त्यास लागून असलेल्या एका नेलपॉलीश कंपनीतील कलरच्या पिंपांना आग लागली आणि तिने पाहता-पाहता प्रचंड स्वरूप धारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अनेकांनी महानगरपालिकेच्या नवघर-माणिकपूर विभागीय कार्यालयात दूरध्वनी केले. परंतु, संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी घेतले नाहीत. त्यामुळे ही आग तासभर तशीच धगधगत राहिली. अखेर, अग्निशमन दलाशी संपर्क झाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)
नवघर येथे नेलपॉलिश कंपनीला आग
By admin | Updated: December 5, 2014 23:10 IST