Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत रहिवासी इमारतीला आग

By admin | Updated: April 14, 2016 07:53 IST

अंधेरी पश्चिमेला रहेजा क्लासिक या रहिवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग भडकली आहे.

ऑनलाइन लोकमत 

 
मुंबई, दि. १४ - अंधेरी पश्चिमेला रहेजा क्लासिक या रहिवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग भडकली आहे. चार फायर इंजिन आणि तीन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलजवळ ही इमारत आहे. 
 
दोन दिवसांपूर्वी भिवंडीतील कासिमपूरा भागातील एका पॉवरलूम कारखान्यात भीषण आग भडकली होती. इमारतीच्या तळमजल्यावर कारखाना तर, वर निवासी मजले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी कोणतीही प्राणहानी होऊ न देता सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले होते.