Join us

तरुणांंच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

तरुणांंच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण

तरुणांंच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण
मुंबई: मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा परिसरातील साईनाथ पार्क या तेरा मजली इमारतीच्या बाराव्या मजवल्यावर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. तरुणांच्या सतर्कतेमुळे वेळीच नियंत्रण आणल्याने मोठी जिवितहानी टळल्याची घटना मुलुंडमध्ये समोर आली.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही आगीची घटना घडली. बाराव्या मजल्यावर असलेल्या इमारतीच्या मुख्य कचर्‍याच्या डब्ब्याला ही आग लागली होती. इमारतीच्या मध्यभागातून गेलेल्या विद्युत पुरवठा करणार्‍या वायरही या आगीच्या वेढ्यात येणार होत्या. मात्र बाराव्या मजल्यावर राहणारे सुधीप कोटल १६ आणि राहुल शाह १७ या दोन तरुणांनी ब्लँकेट आणि घरातील पाण्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी धडपड सुरु केली. त्यात इमारातील आग नियंत्रक साधनेही बंद असल्याने यावर नियंत्रणे तरुणांना कठीण जात होते. मात्र त्यांंच्या प्रसंगासावधानतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले.
याप्रकरणी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणणारे उपकरणे बंद असल्याचे अग्निशमन दलाने सोसायटीला नोटीसही बजावल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)