Join us

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग

By admin | Updated: May 18, 2015 22:46 IST

अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली.

अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणालाही इजा झालेली नसली तरी संपूर्ण कंपनी उद्धवस्थ झाली आहे. एमआयडीसी अग्निशमन विभागाचे पथक सर्वप्रथम पोहचले. कंपनीत ज्वलनशिल केमिकल असल्याने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.