Join us

टीव्हीचा स्फोट झाल्याने आग; जीवितहानी टळली

By admin | Updated: February 1, 2015 22:55 IST

शहरातील प्रभात कॉलनी परिसरात एका फ्लॅटमध्ये चालू टीव्हीचा अचानकपणे स्फोट होवून आग लागली. ही आग वाढून घरातील फर्निचरसह किमती सामान जळून खाक

महाड : शहरातील प्रभात कॉलनी परिसरात एका फ्लॅटमध्ये चालू टीव्हीचा अचानकपणे स्फोट होवून आग लागली. ही आग वाढून घरातील फर्निचरसह किमती सामान जळून खाक झाले. काल रात्री घडलेल्या घटनेत सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. तुळजाभवानी इमारतीमधील सुनील मसुरकर यांच्या घरात त्यांचा मुलगा टीव्ही पाहत असताना अचानक टीव्हीचा स्फोट होवून आग लागली. ही आग वेगात पसरून ती घरभर कमी कालावधीत पसरली. त्यामुळे घरातील अनेक वस्तू या आगीत जळाल्या, मात्र वेळीत प्रसंगावधान साधून घरातील नागरिक घराबाहेर पडल्याने जीवितहानी मात्र झाली नाही. या आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह, फर्निचर आदि सामान जळून खाक झाले. या आगीत अंदाजे एक लाखापेक्षा अधिक हानी झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)