Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिराबाजारातील इमारतीला आग

By admin | Updated: December 4, 2015 02:34 IST

गिरगाव येथील चिरा बाजार भागातील विगा स्ट्रिट या इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच

मुंबई: गिरगाव येथील चिरा बाजार भागातील विगा स्ट्रिट या इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच अग्नीशामक दलाचे आठ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. या चारमजली इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकाने असून यातील एका दुकानात ही आग लागल्याची माहिती अग्नीशामक दलाकडून देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अग्नीशामक दलाकडून ही आग विझवण्याचे काम सुरु होते. नसून आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्नीशामक दलाकडून सांगण्यात आले आहे.