Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरळीतील इमारतीला आग; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST

मुंबई : वरळीतल्या गांधीनगर येथील ३१ माळ्यांच्या रुणवाल इमारतीमधील पंधराव्या मजल्यावरील खोली क्रमांक १५०१ मध्ये शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ...

मुंबई : वरळीतल्या गांधीनगर येथील ३१ माळ्यांच्या रुणवाल इमारतीमधील पंधराव्या मजल्यावरील खोली क्रमांक १५०१ मध्ये शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेबाराच्या सुमारास इमारतीमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली. यात जीवितहानी झाली नाही, मात्र इलेक्ट्रिक वायरिंग, वॉशिंग मशीनसह इतर साहित्य जळून खाक झाले.