Join us  

मुंबईत कांदिवली भागात दुमजली इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 11:53 AM

कांदिवलीच्या अशोकनगर भागातील  एका दुमजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे.

मुंबई - कांदिवलीच्या अशोकनगर भागातील एका दुमजली इमारतीमध्ये  भीषण आग भडकली होती.  या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे.  कांदिवली पूर्वेला अशोच चक्रवर्ती रोडवर बोनेनझा इस्टेट येथे ही दुमजली इमारत आहे. 

अग्निशमन दलाला शनिवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांना आग लागल्याचा फोन आला.  लगेचच 15 मिनिटात अग्निशमन दलाच्या आठ गाडया, सात वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.  

या आगीत इमारतीमधील चार ते पाच गाळे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीत अडकलेल्या चार ते पाच जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. 

 

टॅग्स :मुंबई