Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचे निधन

By admin | Updated: January 1, 2017 13:49 IST

केबलमध्ये अडकलेल्या ससाण्याची सुटका करताना विजेचा धक्का बसून जबर जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचे काल रात्री निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 -  केबलमध्ये  अडकलेल्या ससाण्याची सुटका करताना विजेचा धक्का बसून जबर जखमी झालेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचे काल रात्री निधन झाले. गेल्या महिन्यात  महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात केबलमध्ये अडकलेल्या पक्ष्याची सुटका करताना भोजने यांना विजेचा धक्का बसला होता. त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमधेये उपचार सुरू होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात भोजने यांच्याबरोबरच संजय काळभेरे आणि दिनेश सबनकर हे जवानही जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, भोजने यांच्या कुटुंबीयांनी भोजने यांना शहीदाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.