Join us  

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:46 AM

कमला मिल आग प्रकरणी आरोपी असलेल्या अग्निशमन दलाच्या विभागीय साहाय्यक अधिकाºयाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.

मुंबई - कमला मिल आग प्रकरणी आरोपी असलेल्या अग्निशमन दलाच्या विभागीय साहाय्यक अधिकाºयाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.संदीप शिंदे यांनी जामीन अर्जात म्हटले आहे की, आपण केवळ ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रावर सही केली आहे. कारण त्या दिवशी संबंधित अधिकारी अनुपस्थित होता. कोणत्याही व्यक्तीला जीवे मारण्याचा उद्देश नव्हता. तसेच संबंधित जागेवर उभारण्यात आलेल्या बांधकामामुळे लोकांचा जीव जाईल, याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे भारतीय दंड संहिता ३०४ (सदोष मनुष्यवध) लागू शकत नाही.सरकारी वकिलांनी शिंदेच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. या घटनेत आपली काही भूमिका नाही व अन्य अधिकारी या घटनेला जबाबदार आहे. कारण त्याच्या अनुपस्थितीत आपण सही केली, असा बचाव याचिकाकर्ता घेऊ शकत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी याचिकाकर्त्याने जागेची पाहणी करणे बंधनकारक होते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर म्हटले की, केवळ एकट्या आरोपीवर नाही तर अन्य आरोपींवरही आयपीसी ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला जाऊ शकतो की नाही, हे पाहण्यासाठी अन्य आरोपींची भूमिकाही पाहावी लागेल. २९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिलमधील ‘मोजोस बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन पब्सना आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवन्यायालयमुंबई