मुंबई : एफआयआर या मालिकेत गाजलेली कलाकार कविता कौशिकला खऱ्या आयुष्यात चोरांनी आॅनलाईन पध्दतीने हजारोंचा गंडा घातला. मालाड येथे कविता राहते. भामट्यांनी बनावट क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून तिच्या खात्यातील ८९ हजार ६८८ रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. तपासात ही चोरी लंडन येथून झाल्याचे उघड झाले.१० सप्टेंबरला तिला लागोपाठ दहा वेळा खात्यातून पैसे काढल्याचा संदेश आला. कविताने याबाबत बँंकेकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. तिने तत्काळ डेबिट कार्ड ब्लॉग केला. याप्रकरणी तिने बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)
‘एफआयआर’फेम कविता चौटालाला आॅनलाइन गंडा
By admin | Updated: September 22, 2014 01:40 IST