Join us  

प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी कोहलीविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 11:02 AM

कोहलीवर 323, 326, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. 

मुंबई - प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीविरोधात सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्लफ्रेन्ड आणि फॅशन स्टायलिस्ट निरू रंधवाला मारहाण केल्याप्रकरणी अरमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत निरू रंधवाला गंभीर दुखापत झाली असून, तिला मुंबईतील कोकीलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

अरमान-निरु रंधवामध्ये आर्थिक कारणांमुळे  वाद झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर आरमान कोहलीने गर्लफ्रेन्ड निरू रंधवाला जोरदार मारहाण केली.  निरू रंधवाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अरमान कोहलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तक्रारीमध्ये अरमानने आपल्याला केसाला धरुन मारहान केली, त्याचप्रमाणे पायऱ्यावरुन खाली ढकलल्याचा आरोपही केला आहे. अरमान कोहलीला याप्रकरणी जवळपास सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. रविवारी पोलीस चौकशी करण्यासाठी अरमान कोहलीच्या घरी गेले होते, मात्र तो घरी नसल्यान चौकशी होऊ शकली नाही.

आरमान कोहलीवर323 , 326, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.