Join us

दत्तक घेण्यासाठी विचारेंना सापडेना खेडे

By admin | Updated: November 13, 2014 23:02 IST

प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील किमान एक खेडे दत्तक घेऊन त्याचा आदर्श ग्राम म्हणून विकास करावा, अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

ठाणो : प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील किमान एक खेडे दत्तक घेऊन त्याचा आदर्श ग्राम म्हणून विकास करावा, अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार, प्रत्येक खासदाराने असे खेडे दत्तक घेणो आवश्यक आहे. मात्र, आपला मतदारसंघ संपूर्णत: शहरी असल्याने आपणाला दत्तक घेण्यासाठी एकही खेडे ठाणो लोकसभा मतदारसंघात नाही, असे जिल्हा प्रशासनाने विचारेंना कळविले आहे. त्यामुळे ते हैराण झाले आहेत.
पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजनेनुसार दत्तक घेता येईल, अशा खेडय़ांची यादी कळविण्याबाबत विचारेंनी जिल्हा प्रशासनाला कळविले होते. त्यावर, प्रशासनाने असे उत्तर दिले की, आपला मतदारसंघ हा जास्तीतजास्त नागरीकरण झालेला असून असे एकही खेडे त्यात अस्तित्वात नाही. मुरबाडमधील 127, कल्याण तालुक्यातील 64, भिवंडीतील 1क्6, शहापूरमधील 115, अंबरनाथ तालुक्यातील 26 अशी खेडी असली तरी त्यातले  एकही खेडे तुमच्या ठाणो लोकसभा मतदारसंघात अंतभरूत होत नाहीत, त्यामुळे त्यांची शिफारस या योजनेसाठी करता येत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यावर, विचारे यांनी येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील काही पाडे आणि नवी मुंबईतील आडवली-भूतिवली अशी खेडी उदाहरणार्थ आपल्या विनंतीपत्रत नमूद केली होती. त्यांचा उल्लेख जिल्हाधिका:यांनी पाठविलेल्या उत्तरातील खेडय़ांच्या यादीत नाही. त्यामुळे आता विचारेंवर मतदारसंघाबाहेरचे खेडे दत्तक घेण्याची पाळी ओढवणार आहे.
(विशेष प्रतिनिधी)
 
4पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजनेनुसार दत्तक घेता येईल, अशा खेडय़ांची यादी कळविण्याबाबत विचारेंनी जिल्हा प्रशासनाला कळविले होते. त्यावर, प्रशासनाने असे उत्तर दिले की, आपला मतदारसंघ हा नागरीकरण झालेला असून दत्तक घेण्याजोगे एकही खेडे त्यात नाही.