Join us

‘कोरे’चा ठिकाणा शोधा मोबाइलवर

By admin | Updated: November 26, 2014 02:05 IST

रेल्वे तसेच अन्य वाहतुक सेवांचे स्वतंत्र मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले असतानाच आता कोकण रेल्वेनेही यात उडी घेतली आहे.

मुंबई : रेल्वे तसेच अन्य वाहतुक सेवांचे स्वतंत्र मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले असतानाच आता कोकण रेल्वेनेही यात उडी घेतली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणा:या गाडय़ांची माहीती प्रवाशांना मोबाईल अॅप्लिकेशनवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. 
स्मार्ट फोनचा वापर सध्या मोठय़ा प्रमाणात होत आहे. यातून प्रवाशांना सहजतेने माहीती उपलब्ध होते. रेल्वे तसेच खासगी टॅक्सी सेवा आणि अन्य वाहतुक सेवांनी या स्मार्ट फोनचा पुरेपुर फायदा उचलत स्वत:ची अॅप्लिकेशन्स सुरु केली आहेत. यात कोकण रेल्वे मात्र बरीच मागे होती. 
हे अॅप्लिकेशन कोकण रेल्वेने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्धही करून दिले आहे. हे अॅप ँ33स्र2://स्र’ं8.ॅॅ’ी.ूे/231ी/ंस्रस्र2/ीि3ं्र’2?्र=ि1ॅ.‘1ू’.‘1ू’ंस्रस्र  या लिंकवरून डाऊनलोड करता येईल. 
 
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले की, ‘हे अॅप कुठल्याही अॅन्ड्रॉईड आणि ब्लॅकबेरी स्मार्ट फोनवर डाऊनलोड होऊ शकते. या अॅपमुळे कोकण रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक तसेच गाडय़ांची सद्यस्थितीही बघता येणार आहे. या अॅपवरुन कोकण रेल्वेचे संकेतस्थळही पाहता येते. कोकण रेल्वचे फोटोही इथे पाहता येतील.