Join us

‘पुतळ्याआधी माणसांच्या हत्येचे मास्टरमाईंड शोधा!’

By admin | Updated: January 10, 2017 04:38 IST

पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडणाऱ्या मास्टरमाईंडची काळजी घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी दाभोलकर

मुंबई : पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडणाऱ्या मास्टरमाईंडची काळजी घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांमागील मास्टरमाईंड शोधावा, असा टोला संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेवर जोरदार टीका केली.आखरे म्हणाले की, संभाजी महाराजांच्या उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवून त्याजागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुणे महानगरपालिकेला १ मे २००७ साली निवेदन देऊन केली होती. संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यया व्यक्तीचा पुतळा किमान त्यांचेच नाव असलेल्या उद्यानात ठेवू नये, असेही निवेदनात सांगण्यात आले होते. मात्र १० वर्षांमध्ये मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात ही कृती केली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पुतळा हटवल्यावर दु:ख व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. इतकाच पुळका असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पानसरे, दाभोलकर या थोर व्यक्तींची हत्या करणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही आखरे यांनी दिला. (प्रतिनिधी)शिवसेनेला अल्टीमेटम! : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्या शिवसेनेने शिवसेना भवनवर छत्रपतींच्या पुतळ््यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा लावला आहे. हा महाराजांचा अपमान असून शिवसेने तातडीने छत्रपतींचा पुतळा अग्रस्थानी लावण्याचे आवाहन त्यांनी निवेदनातून मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना केले आहे. नाहीतर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा आखरे यांनी शिवसेनेला यावेळी दिला.