Join us

कोरोना संकटप्रसंगी हिंद मजदूर सभेशी संलग्न असणाऱ्या कामगार संघटनांची सरकारला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:28 IST

जगात व देशात कोव्हीडने थैमान घातले असून, अशा संकटप्रसंगी हिंद मजदूर सभेशी संलग्न असणाऱ्या विविध कामगार संघटनांनी केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे.

मुंबई  :  जगात व देशात कोव्हीडने थैमान घातले असून, अशा संकटप्रसंगी हिंद मजदूर सभेशी संलग्न असणाऱ्या विविध कामगार संघटनांनी केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, जनरल मजदूर सभा, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, वेस्टर्न रेल्वेमेन्स युनियन, संरक्षण खात्यातील अँम्युनेशन फॅक्टरी वर्कर्स युनियन, नॅशनल युनियन सीफेरर्स ऑफ इंडिया, मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया, अलंग सोसिया शिप रिसायकलिंग अँड जनरल वर्कर्स असोसिएशन अशा विविध संघटनांतर्फे केंद्र व राज्य सरकारला यावेळी मदत देण्यात आली आहे.नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू नायर, कार्याध्यक्ष अरुण मनोरे यांनी पंतप्रधान निधीला ५१ लाख रुपये व महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला ५१ लाख रुपये,  वेस्टर्न रेल्वेमेन्स युनियनचे सरचिटणीस जे. आर. भोसले यांनी पंतप्रधान निधीला ५२ लाख रुपये व महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला २५ लाख रुपये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. एस. के. शेट्ये, सरचिटणीस सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष किशोर कोतवाल, सरचिटणीस केरशी पारेख व मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इतर कामगार संघटनांच्यावतीने पंतप्रधान निधीला एक कोटी सत्तावीस लाख रुपये, संरक्षण खात्यातील अँम्युनेशन फॅक्टरी वर्कर्स युनियन तर्फे पंतप्रधान निधीला एक कोटी पंधरा लाख चौतीस हजार आठशे ९१  रुपये,  ( 1,15,34,891 रुपये), नॅशनल युनियन सीफेरर्स ऑफ इंडियाचे सरचिटणीस अब्दुल गणी सेरंग यांनी पंतप्रधान निधीला 25 लाख रुपये, मेरिटीम युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमरसिंग ठाकूर यांनी पंतप्रधान निधीला 25 लाख रुपये देणगी दिली आहे. जनरल मजदूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर व सरचिटणीस संजय वढावकर यांनी भिवंडी येथील पॉवरलूम व लॉजीस्टिकल मधील असंघटित कामगारांच्या कुटुंबियांना 5 किलो गहू व 5 किलो तांदूळ वाटप केले. अलंग सोसिया शिप रिसायकलिंग अँड जनरल वर्कर्स असोसिएशनचे सरचिटणीस विद्याधर राणे यांनी भावनगर जिल्हाधिकार्याशी संपर्क साधून दहा हजार सातशे जहाज तोडणी कामगारांना रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले, अशी माहिती हिंद मजदूर सभेचे प्रसिध्दीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.