Join us

शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 01:02 IST

दहिसर येथे स्वातंत्र्य दिनी शहिदांना सलाम करणारी राष्ट्रभक्तीची दहीहंडी साजरी करण्यात आली.

मुंबई : दहिसर येथे स्वातंत्र्य दिनी शहिदांना सलाम करणारी राष्ट्रभक्तीची दहीहंडी साजरी करण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक विनोद घोसाळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाºया शहीद श्रावण बाळकू माने (कोल्हापूर) आणि शहीद नाईक संदीप सर्जेराव जाधव (औरंगाबाद) आणि शहीद संजीव सुरेश खंडारे (अकोला) यांच्यासह सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित दहीकाला उत्सवात उपस्थित शहिदांच्या वीरपत्नी माने कुटुंबीय आणि वीरपत्नी जाधव कुटुंबीय, वीरपत्नी खंदारे कुटुंबीय यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्यात आली. अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यातील जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत करण्यात आली.