Join us  

अखेर ‘ती’ला मिळाला न्याय, पतीकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:09 AM

एका तरुणीशी लग्न करून ती गर्भवती असताना तिला अर्ध्यावर सोडून दुबईत गेलेल्या एका हिरे व्यापाऱ्याला शुक्रवारी चारकोप पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे तो ११ वर्षे फरार असल्याने त्याच्या विरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली होती.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : एका तरुणीशी लग्न करून ती गर्भवती असताना तिला अर्ध्यावर सोडून दुबईत गेलेल्या एका हिरे व्यापाऱ्याला शुक्रवारी चारकोप पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे तो ११ वर्षे फरार असल्याने त्याच्या विरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली होती. मात्र, भारतात परतल्यानंतर विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात हजर होऊन अटकपूर्व जामिनासाठी तो प्रयत्नशील होता.मिथुन पताडिया (३७) असे त्याचे नाव असून तो दुबईत हिºयांचा व्यापार करतो. पत्नीची फसवणूक करून दुबईत फरार झाल्याने त्याच्याविरोधात चारकोप पोलिसांनी ‘स्टँडिंग वॉरंट’ आणि ‘ब्लु कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. ११ वर्षांनंतर ७ मार्चला तो भारतात परतला आणि ८ तारखेला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी त्याने अर्ज केला. मात्र, वीणा (नावात बदल) आणि तिच्या वकिलांनी याबाबत पाठपुरावा केल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.पताडियाने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर २००६ साली चारकोपमधील वीणा या तरुणीशी लग्न केले आणि दुबईला घेऊन गेला. मात्र, वीणाला दिवस गेल्यानंतर पताडिया अन्य तरुणींना घरी आणू लागला. त्याच्या बाहेरख्याली स्वभावामुळे दोघांत रोज भांडण होऊ लागले. त्यामुळे सातवा महिना लागल्यानंतर तिने ही बाब भारतात फोन करून आईला सांगितली. तेव्हा तिची आई दुबईला गेली आणि पहिल्या बाळंतपणासाठी वीणाला भारतात परत घेऊन आली. तिने १९ आॅक्टोबर २००७ रोजी एका मुलाला जन्म दिला तेव्हा पतीसोबतचे आपले संबंध सुधारतील अशी तिला आशा होती. मात्र, पताडिया आणि त्याच्या आईने तिला घरात घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर मूलदेखील पताडियाचे नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वीणाने या प्रकरणी १५ नोव्हेंबर, २००७ रोजी चारकोप पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पताडिया दुबईला पळून गेला. त्याच्याविरोधात ‘स्टँडिंग वॉरंट’ व ‘ब्लु कॉर्नर नोटीस’ लागू करण्यात आली. तेव्हापासून तो फरार होता.मिथुन पताडिया असा सापडला कचाट्यात...पत्नीची फसवणूक करून दुबईत फरार झाल्याने मिथुन पताडियाविरोधात चारकोप पोलिसांनी ‘स्टँडिंग वॉरंट’ आणि ‘ब्लु कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. ११ वर्षांनंतर ७ मार्चला तो भारतात परतला आणि ८ तारखेला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी त्याने अर्ज केला.मात्र, वीणा आणि तिच्या वकिलांनी याबाबत पाठपुरावा केल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

टॅग्स :न्यायालयगुन्हा