मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील काळे मार्गाहून वाहणारे सांडपाणी आता बंद झाले आहे. महापालिकेने रातोरात हे काम केल्याने रस्ता कोरडा झाला असून, स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कुर्ला-अंधेरीला जोडणाऱ्या कुर्ला पश्चिमेकडील काळे मार्गावर महापालिकेकडून मलनि:सारणाचे काम सुरू आहे.मात्र, या कामादरम्यान बाहेर निघणारे सांडपाणी भररस्त्यातून वाहत होते. परिणामी रस्त्याची दुरवस्था झाली होती. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या महापालिकेने रातोरात समस्या सोडवत सांडपाण्याचा मार्ग मोकळा केला आहे.त्यामुळे सांडपाणी वाहत असलेला रस्ता आता कोरडा झाला असून, वाहनांसह पादचारी वर्गाला अडचणी येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, हा मार्ग एक दिशा असल्याने वाहनचालकांकडून नियम मोडले जाणार नाहीत; यासाठीवाहतूक पोलिसांनी दक्ष राहावे, असे स्थानिक राकेश पाटील यांनी म्हटले आहे.
...अखेर ‘तो’ रस्ता झाला कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:32 IST