Join us  

अखेर धारावीचा पुनर्विकास दुबईतील सेकलिंकच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 7:38 AM

राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. कारण धारावीच्या पुनर्विकासासाठी दाखल झालेल्या दोन निविदांची नुकतीच छाननी करण्यात आली आहे. त्यानुसार, धारावी पुनर्विकासाचे काम दुबईस्थित सेकलिंक कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. काही दिवसांतच राज्य सरकारकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून २००९ पासून तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्याची नामुश्की धारावी पुनर्विकास प्रकल्पावर ओढावली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत नसल्याने, अखेर राज्य सरकारने प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देत, सार्वजनिक-खासगी कंपनीची स्थापना करत प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, डिसेंबर, २०१८ मध्ये तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दुसºया मुदतवाढीत अखेर दोन निविदा सादर झाल्या.१५ जानेवारीला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. या वेळी अदानी आणि दुबईतील नामांकित अशा सेकलिंक कंपनीने धारावी पुनर्विकासासाठी निविदा सादर केल्या. यापैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अंतिम छाननीअंती दुबईतील सेकलिंक या नामांकित कंपनीच्या नावावर धारावी पुनर्विकास प्रकल्पअधिकाºयांनी शिक्कामोर्तब केले....त्यानंतरच होणार अधिकृत घोषणाधारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून येत्या काही दिवसांत सेकलिंकला या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यासंदर्भात सांगण्यात येईल. त्यानंतर, राज्य सरकारकडून या प्रस्तावाचा व्यवस्थित अभ्यास करून महिन्याभराच्या आतच सेकलिंकच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

टॅग्स :मुंबई