Join us

अखेर भाजपा रॅलीतील बाळासाहेबांचा प्रचार थांबला

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

अखेर भाजपा रॅलीतील बाळासाहेबांचा प्रचार थांबला

अखेर भाजपा रॅलीतील बाळासाहेबांचा प्रचार थांबला
मुंबई: युतीमध्ये झालेल्या फुटीनंतरही भाजपाकडून उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीतील शिवसेना प्रमुखांंचा वापरण्यात येणार्‍या फोटोमुळे शिवसैनिकांत नाराजीचा सूर होता. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहचले असताना शिवसैनिकांंच्या आक्रमक मागणीनंतर आमदारांनी त्यांंच्या प्रचार रॅलीतील वाहनांवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंचे सर्व फोटो हटविले आहेत.
मुलुंड विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून उभे असलेले आमदार सरदार तारासिंग यांनी त्यांंच्या प्रचार पत्रकासह प्रचार रॅलीत वापरण्यात येणार्‍या वाहनांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंच्या प्रतिमेचा वापर केला होता. मात्र हा वापर शिवसैनिकांंची दिशाभूल करण्यासाठी करण्यात येत असून त्यातून आचारसहिंतेचा भंग होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. तारासिंग यांनी लवकरात ठाकरे यांंच्या प्रतिमा गाडीवरुन आणि प्रसिद्धी पत्रकातून हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. शिवसैनिकांंच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर तारासिंग यांनी बाळासाहेबांची सर्व प्रतिमा हटविल्या आहेत. (प्रतिनिधी)