Join us  

अखेर ‘त्या’ पेपर सेटरवर मुंबई विद्यापीठाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:11 AM

पिल्लई महाविद्यालयाच्या अंतर्गत पूर्वपरीक्षेच्या मेटल टेक्नॉलॉजी या विषयाची प्रश्नपत्रिका आणि मुंबई विद्यापीठाच्या याच विषयाच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळल्याने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पेपर सेटर्सवर कारवाई केली.

मुंबई : पिल्लई महाविद्यालयाच्या अंतर्गत पूर्वपरीक्षेच्या मेटल टेक्नॉलॉजी या विषयाची प्रश्नपत्रिका आणि मुंबई विद्यापीठाच्या याच विषयाच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळल्याने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पेपर सेटर्सवर कारवाई केली.विद्यापीठाने अवैध साधनसामग्री चौकशी समितीची सभा घेऊन, या विषयाचे अध्यक्ष, पेपरसेटरची चौकशी केली व पेपर सेटरच्या अध्यक्षांचे तीन वर्षांसाठी शिक्षक मान्यतेचे निलंबन केले असून को-पेपर सेटर यांचे दोन इंक्रीमेंट (वेतनवाढ) थांबविल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.‘महाविद्यालय आणि विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सेम टू सेम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत विद्यापीठाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.पुनर्परीक्षा घेण्याची शिफारसदिनांक २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सत्र तीनच्या मेटल टेक्नॉलॉजी विषयाची प्रश्नपत्रिका ही पिल्लई महाविद्यालय येथील चाचणी प्रश्नपत्रिकेची हुबेहूब प्रत असल्याचे निदर्शनास येताच या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने योग्य ती चौकशी केली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि मॅकेनिकल इंजिनीअरिंग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या समितीसमोर ही बाब ठेवून, या प्रकरणी शहानिशा केली असता संबंधित पिल्लई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मेटल टेक्नॉलॉजी या विषयाची पुनर्परीक्षा घ्यावी व त्याबाबत स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करावे, अशी शिफारस करण्यात आली.

टॅग्स :परीक्षामहाविद्यालय