Join us

..अखेर ठाणो परिवहनचे मुंबई सीमोल्लंघन

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

नवी मुंबईप्रमाणो आता ठाणो परिवहन सेवेतही 1क् व्होल्व्हो (वातानुकूलित) बसेस दाखल झाल्या असून आठवडाभरात त्या घोडबंदर ते मुंबई या मार्गावर धावणार आहेत.

ठाणो : नवी मुंबईप्रमाणो आता ठाणो परिवहन सेवेतही 1क् व्होल्व्हो (वातानुकूलित) बसेस दाखल झाल्या असून आठवडाभरात त्या घोडबंदर ते मुंबई या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे मुंबईला जाणा:या प्रवाशांना याचा फायदा होईल. पुढील दोन टप्प्यांत आणखी 2क् बसेस दाखल होणार असल्याची माहिती परिवहनने दिली. 
बेस्ट, वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदी परिवहन सेवांनी आपली वेस ओलांडून ठाण्यात प्रवेश केला आहे. परंतु, आता उशिराने का होईना ठाणो परिवहन सेवादेखील ठाण्याची वेस ओलांडून मुंबईत प्रवेश करणार आहे.
सध्या ठाणो परिवहन सेवेचा कारभार घसरला आहे. परिवहनमध्ये 35क् बसेस असल्या तरी त्यातील केवळ 16क् ते 17क् बसेसच रस्त्यांवर धावत आहेत. परिणामी, परिवहनचे उत्पन्न आणि प्रवासी संख्यादेखील घटली आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात जेएनएनयूआरएमअंतर्गत 23क् बसेस घेण्याचा ठराव लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर होऊन तो केंद्राकडे पाठविण्यात आला होता. परंतु, केंद्राने जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद केल्याने या बसेस दाखल होतील अथवा नाही, याबाबत साशंकता होती. अखेर, या बसेसचा मार्ग मोकळा झाला असून त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात 1क् व्होल्वो बसेस दाखल झाल्या आहेत. 
याव्यतिरिक्त दुस:या टप्प्यात दाखल होणा:या 2क् बसेस बोरिवली, दादर आणि नवी मुंबईतील मिलेनियम पार्कर्पयत धावणार आहेत. 
याची चाचपणी सुरू करण्यात आली असून बसेस दाखल झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिवहनने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
 
डिसेंबरपासून परिवहनच्या ताफ्यात उर्वरित 19क् बसेसही टप्प्याटप्प्यांनी दाखल होणार आहेत. या 19क् बसेसमध्ये 14क् बसेस या सेमी लोअर फ्लोअर आणि 5क् मिडीबसेसचा समावेश असल्याचेही परिवहनने स्पष्ट केले.
 
सध्या या बसेस परिवहनच्या आगारात उभ्या असून पुढील टप्प्यात 2क् बसेस दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या 1क् बसेस  घोडबंदर ते मुंबई या मार्गावर धावणार आहेत. यातील पाच बसेस या घोडबंदर हिरानंदानी ते बीकेसी या मार्गावर धावणार असून घोडबंदर, कॅडबरी, नितीन, तीनहातनाका, आनंदनगर चेकनाका या मार्गावरून घाटकोपरमार्गे पुढे जाणार आहेत. उर्वरित 5 बसेस कासारवडवली ते सीप्झ, अंधेरी ईस्ट, आगरकर चौक या मार्गावर धावणार असून  घोडबंदर, कॅडबरी, नितीन, तीनहातनाका मार्गावरून एलबीएसमार्गे पुढे सीप्झला जाणार आहे. दिवसभरात या दोनही बसेसच्या 16-16 फे:या होणार असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रंनी दिली.