मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून अपु:या सोयी व अनेक समस्यांचा सामना करीत म्हाडाच्या संक्रमण शिबिरात (ट्रान्ङिास्ट कॅम्प) मध्ये राहत असलेल्यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता लवकरच हक्काचा पक्का निवारा मिळणार असून, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्यावतीने सुमारे 6क्क् घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या 2-3 दिवसांमध्ये त्याबाबतची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
मध्य मुंबईतील दादर, परळ, प्रभादेवी आदी ठिकाणच्या इमारतींमध्ये या सदनिका आहेत. सुमारे दोन-अडीच वर्षानंतर इतक्या मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आरआर बोर्डाकडे अनेक वर्षापासून ‘मास्टर लिस्ट’चा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. त्याबाबत म्हाडाच्या काही अधिकारी दलालांच्या माध्यमातून गैरव्यवहार करून कोटय़वधीची कमाई करीत असल्याचा आरोप मूळ रहिवाशांकडून होत राहिला. जुन्या इमारती, चाळीतील भाडेकरू, रहिवाशांची ही ओरड सुरू असताना मंडळाने ‘मास्टर लिस्ट’साठी नावे दिलेल्या 1,3क्क् जणांच्या यादीची पात्रता तपासण्याचे काम पूर्ण केले आहे. पुनर्विकास झालेल्या किंवा होणा:या चाळी, इमारतींमध्ये पूर्वी राहत असल्याबाबत पुरावा, कागदपत्रंची पडताळणी करून त्यांची पात्रता करून त्यापैकी जवळपास 9क्क् जणांना पात्र ठरवलेले आहे. उर्वरित 4क्क् जणांना आवश्यक पुरावे देण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही तो सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार पात्र असलेल्यांबाबत लवकरच यादी जाहीर केली जाणार आहे. पात्र ठरलेल्या 9क्क् जणांपैकी सुमारे 6क्क् जणांना लवकरच हक्काच्या फ्लॅटमध्ये राहण्यास मिळणार आहे. (प्रतिनिधी)