Join us

अखेर हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलला मिळाली ओसी !

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 27, 2022 19:02 IST

कूपर हॉस्पिटलच्या हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची अंधेरी पश्चिम टाटा कंपाउंड येथील होस्टेलची इमारत 2018 साली बांधून तयार होती.

मुंबई-कूपर हॉस्पिटलच्या हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची अंधेरी पश्चिम टाटा कंपाउंड येथील होस्टेलची इमारत 2018 साली बांधून तयार होती.मात्र येथील विद्यार्थीची अँडमीशन बिल्डिंग एन.ओ.सी,लिफ्ट एन.ओ.सी व फायर एन.ओ.सी नसल्याने  विद्यार्थी होस्टेल साठी वणवण फिरत होते.मात्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आणि लोकमतच्या पाठपुराव्याला यश येवूनअखेर हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलला  एनओसी मिळाली !त्यामुळे नव्या वर्षात लवकरच येथील होस्टेल सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात  डॉ.दीपक सावंत यांनी पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल,अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून पाठपुरावा केला होता. यासंदर्भात लोकमत ऑन लाईन आणि लोकमत मधील बातम्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती.

तसेच आपण नुकतीच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना  निवेदन दिले.मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना आपल्या उपस्थितीत फोन करून आपल्या मागणीचीत्वरित  दखल घेत हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलला लवकर सुरू करा,यासंदर्भात लागणाऱ्या एन.ओ.सी त्वरित द्या असे आदेश दिले होते.

दस्तुरखुद्द पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांनी सदर महत्वाच्या प्रकरणी स्वत: रस घेऊन या होस्टेलला लागणाऱ्या संबंधित एन.ओ.सीची कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती आज आपल्याला  दिल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :मुंबई