Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘तो’ मृतदेह मायदेशी दाखल होणार

By admin | Updated: June 9, 2015 03:55 IST

सौदी अरेबियात मृत्यू झालेल्या विक्रोळीतल्या रजनीकांत दलाल यांचा मृतदेह अखेर मायदेशी आणण्यात येणार आहे.

मुंबई : सौदी अरेबियात मृत्यू झालेल्या विक्रोळीतल्या रजनीकांत दलाल यांचा मृतदेह अखेर मायदेशी आणण्यात येणार आहे. तेथील गव्हर्नरच्या परवानगीच्या नव्या नियमामुळे महिनाभरापासून त्यांचा मृतदेह तेथे अडकून आहे. आता गव्हर्नरची परवानगी मिळाली असून, ११ जून रोजी मृतदेह भारतात पाठविण्यासाठी कार्गो बुकिंग करण्यात आले आहे, असे भारतीय दूतावासाचे अधिकारी अशोक दीक्षित यांनी सांगितले.विक्रोळीतील कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती तेथील मित्रांकडून समजताच त्यांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कागदोपत्री व्यवहार पूर्ण केला. तरीही विविध कारणांमुळे गेल्या दीड महिन्यापासून त्यांचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्यांची वणवण सुरू आहे. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर यासंबंधीच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या.