Join us  

...अखेर तेजस एक्स्प्रेसमध्ये झाला ‘जय महाराष्ट्र’चा घोष; रेल्वे सुंदरींनी गांधी टोप्या घालून केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:04 AM

गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत रंगांना महत्त्व आहे. प्रत्येक बाबीमध्ये रंगसंगती दिसून येते. या रंगसंगतीद्वारे पेहरावाचा रंग तयार केला आहे.

कुलदीप घायवटमुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील शुक्रवारी धावलेल्या पहिल्या खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, मुंबई सेंट्रल येथे तेजस एक्स्प्रेस दाखल झाल्यावर ‘जय महाराष्ट्र’चा घोष रेल्वे सुंदरी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला, तसेच ढोल-ताशांच्या गजरात फेटा-सदरा घातलेल्या वादकांनी या एक्स्प्रेसचे स्वागत केले. तेजस एक्स्प्रेसमधील रेल्वे सुंदरी, कर्मचाऱ्यांनी गुजराती वेशभूषा परिधान केली होती. मात्र, मुंबईत आल्यावर मराठी पेहराव म्हणून गांधी टोपी घालून प्रवाशांचे स्वागत केले.

दिल्ली ते लखनऊ पहिल्या खासगी एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस शुक्रवारी धावली. पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या खासगी एक्स्प्रेसचा मान अहमदाबाद ते मुंबई एक्स्प्रेसला मिळाला आहे. ही एक्स्प्रेस अहमदाबादहून सकाळी १०.३०च्या सुमारास सुटली. त्यानंतर, ५च्या सुमारास मुंबई सेंट्रलला पोहोचली. या एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा पेहराव गुजराती धाटणीचा होता, तर एक्स्प्रेसवरील नावाची पाटी हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत होती. महाराष्ट्रातून धावणाºया खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी संस्कृती, भाषा वगळण्यात आल्याने मराठीप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या.

अहमदाबादहून एक्स्प्रेस सुटल्यावर प्रत्येकाला ‘गुड मार्निंग, तेजस एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे’ असे बोलून प्रवाशांचे स्वागत केले. गरबा, दांडिया यांचा जल्लोष करून अहमदाबादहून एक्स्प्रेस सुटली. मात्र, मराठी संस्कृती आणि भाषेचा उल्लेख नसल्याने मराठीप्रेमी तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवर येऊ देणार नव्हते, पण आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मराठी पेहराव म्हणून रेल्वे सुंदरी, रेल्वे कर्मचाºयांना गांधी टोप्या दिल्या. या टोप्या रेल्वे सुंदरींनी परिधान करून प्रवाशांचे ‘जय महाराष्ट्र’ बोलून स्वागत केले.

आयआरसीटीसीच्या पर्यटन विभागाच्या संचालिका रजनी हसिजा म्हणाल्या की, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत रंगांना महत्त्व आहे. प्रत्येक बाबीमध्ये रंगसंगती दिसून येते. या रंगसंगतीद्वारे पेहरावाचा रंग तयार केला आहे. अहमदाबादहून तेजस एक्स्प्रेस सुटल्यावर गुजराती पेहराव आणि मुंबई सेंट्रलवरून सुटल्यास पांढºया रंगाचा टोपीचा पेहराव करण्यात येईल. अनेक राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेला समरस असलेला रेल्वे सुंदरी आणि रेल्वे कर्मचाºयांचा पेहराव आहे.इशाºयानंंतर बदलला पेहरावमनसे पदाधिकारी मिलिंद पांचाळ म्हणाले की, अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेस शुक्रवारी धावली. मात्र, या एक्स्प्रेसमध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यावर आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला. गुजराती संस्कृतीसह महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, नाहीतर मुंबईत गाडी येऊ देणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर, आयआरसीटीसीच्या अधिकाºयांनी मराठी पेहराव म्हणून गांधी टोप्या रेल्वे सुंदरी आणि रेल्वे कर्मचाºयांना दिल्या.

टॅग्स :तेजस एक्स्प्रेसपश्चिम रेल्वे