Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: अखेर सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कूपर हॉस्पिटल मधील कॅथलॅब झाली सुरू, डॉ. दीपक सावंत यांच्या पाठपुराव्याला यश 

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 28, 2022 17:32 IST

Mumbai: पश्चिम उपनगरातील महापालिकेचे आधारवड असलेल्या विलेपार्ले पश्चिम येथील सुमारे सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये दि,25 डिसेंबर पासून अँजिओप्लास्टीला सुरूवात झाली.

- मनोहर कुंभेजकर मुंबई -पश्चिम उपनगरातील महापालिकेचे आधारवड असलेल्या विलेपार्ले पश्चिम येथील सुमारे सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये दि,25 डिसेंबर पासून अँजिओप्लास्टीला सुरूवात झाली. मात्र अँजिओग्राफी सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू झाल्यानंतर येथे अँजिओप्लास्टी सुरू झाली! दैनिक लोकमतने यासंदर्भात दि,7 डिसेंबर 2021 रोजी सविस्तर वृत्त देवून पालिका प्रशासन आणि तत्कालीन महाआघाडी सरकारचे लक्ष वेधले होते.

पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल आणि येथील तत्कालीन डीन डॉ.पिनाकीन शाह यांच्या बरोबर बैठक घेतली आणि सूचना केल्या होत्या. गेली सात वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकमतने देखिल याप्रकरणी पाठपूरावा केल्या बद्धल त्यांनी लोकमतचे आभार मानले.

कूपर हॉस्पिटलला भेटी देवून बैठका घेतल्या होत्या.युती सरकारच्या काळात आरोग्य मंत्री असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 2015 साली हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या  उद्घाटनाच्या वेळी येथे कॅथ लॅब व इतर सुविधा देण्याचे घोषित केले होते.येथील डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी कॅथ लॅब २०२२ जानेवारीपूर्वी कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले.परंतू येथील कॅथ लॅब सुरू व्हायला सात वर्षे लागली अशी माहिती त्यांनी दिली.

येथे जखमा धुण्यासाठी व ड्रेसिंग  करण्यासाठी  बनॅ युनिट आवश्यक  आहे. बर्न वॉशिंग युनिट धुण्यासाठी बर्न युनिट आणि ड्रेसिंगसाठी बर्न वॉर्डमध्ये ठेवण्याची त्यांनी पालिका आयुक्तांना विनंती केली. दोन वर्षापूर्वी येथे डायलिसिस सुरू झाले,मात्र अजूनही तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत धूळ खात पडली असून तिचा वापर होत्वनाही याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.

डीएनबी आणि सीपीएस अभ्यासक्रमांमधील शीतयुद्ध आणि प्रक्रियेत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे .यासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक आहे. त्यामुळे पदव्युत्तर जागा कमी आहेत तसेच सिव्हील इंजिनीअर, इलेक्ट्रीकल इंजिनीअर  कमी आहेत याकडे त्यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल