ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत लागू असलेल्या एलबीटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आता पुढील कार्यवाहीसाठी आणि एलबीटी सुरू ठेवावा अथवा त्याऐवजी पुन्हा जकात सुरू करावी, यासंदर्भातील निर्णय ठाण्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन आणि व्यापारीवर्गाची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.एलबीटीसंदर्भात नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत सर्व महापौर व आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्या-त्या महापालिकांनी करासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार, आता ही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या लागू असलेल्या कर प्रणालीत अनेक जाचक अटी आहेत. त्या शिथिल केल्यास व्यापारीवर्ग कर भरण्यास निश्चित तयार आहे. याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही व पालिकेचे उद्दिष्ट साध्य होईल, तशी कार्यवाही करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधितांबरोबर निवेदन सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एलबीटीबाबत बैठकीअंती निर्णय - महापौर
By admin | Updated: June 13, 2014 01:14 IST