मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातील रिक्त असलेली पदे आणि पदोन्नतीची पदे तातडीने भरण्याची मागणी करत म्युनिसिपल मजदूर युनियनने गुरुवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला. आस्थापनेतील कामगारांना अद्याप गणवेष, टॉवेल, साबण, रेनकोट, वुलनकोट, गमबूट, सेप्टीशूज इत्यादी सामानाचे वाटप झाले नसल्याचा आरोप युनियनने केला. शिवाय २०१४ सालच्या शिलाई भत्त्यासह २०१२-१३ या वर्षांतील न मिळालेल्या वस्तूंची रोख रक्कम वेतनात देण्याची मागणी युनियनने केली आहे. (प्रतिनिधी)
रिक्त पदे भरा!
By admin | Updated: September 4, 2015 00:47 IST