Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अण्णा’ टोळीवर गुन्हे दाखल

By admin | Updated: July 26, 2015 03:43 IST

मालाड पश्चिमकडे बँकेतून बाहेर पडणाऱ्या लोकांना हटकून त्यांना लुबाडणाऱ्या ‘अण्णा’ टोळीतील अमर तेलगू (२०), श्रीनिवास गवंडर (३५), रवी बोवी (२५) आणि शंकर लक्ष्मण

मुंबई : मालाड पश्चिमकडे बँकेतून बाहेर पडणाऱ्या लोकांना हटकून त्यांना लुबाडणाऱ्या ‘अण्णा’ टोळीतील अमर तेलगू (२०), श्रीनिवास गवंडर (३५), रवी बोवी (२५) आणि शंकर लक्ष्मण ऊर्फ कृष्णा तेलगू (१९) यांना मालाड पोलिसांनी अटक केली होती. या टोळीने मुंबईसह ठाण्यातही अशाच प्रकारे लोकांना लुबाडल्याचे तपासाअंती समोर आले असून पोलीस त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करत आहेत.मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक सांडभोर यांनी सांगितले की, बिस्किटाची पेस्ट बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्यांच्या अंगावर उडवायची. त्यानंतर त्या व्यक्तीला ‘तुमच्या कपड्यावर घाण लागली आहे’, असे सांगत ती व्यक्ती कपडे झटकू लागली की हातातील बॅग घेऊन पसार व्हायचे, अशा पद्धतीने ही टोळी लोकांना लुबाडत होती.