Join us

हंडीचा पहिला गुन्हा दाखल

By admin | Updated: September 9, 2015 01:19 IST

दहीहंडीेसाठी २० फुटांपेक्षा अधिक उंचीचे थर लावल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी दादर येथील साई दत्त क्रीडा मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोविंदापथकाविरोधात केलेली ही मुंबईतील पहिलीच कारवाई आहे.

मुंबई: दहीहंडीेसाठी २० फुटांपेक्षा अधिक उंचीचे थर लावल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी दादर येथील साई दत्त क्रीडा मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोविंदापथकाविरोधात केलेली ही मुंबईतील पहिलीच कारवाई आहे.दहीहंडीत १८ वर्षांखालील मुलांना सहभागी करू नका, २० फुटांपेक्षा अधिक थर लावू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीवर पोलिसांची नजर होती. मात्र पोलीस कारवाई करतील का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. अखेर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत वरील मंडळावर नियमांच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३३६, १८८ कलमान्वये मंडळाचे आयोजक कृष्णा सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.व्हिडीओ रेकॉर्डिंगची तपासणीदहीहंडी उत्सवादरम्यान बड्या आयोजकांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ८०० हंड्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. या रेकॉर्डिंगची तपासणी सुरू असून, यामध्ये दोषी आढळलेल्या आयोजकांवरही कारवाई केली जाईल.