मुंबई : महिलेच्या बनावट अकाउंटवर तिच्यासह तिच्या बहिणीचे आणि मैत्रिणेचे फोटो अपलोड केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी सांताक्रुझच्या हसनअली सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल केला.नालासोपारा परिसरात ५३ वर्षीय तक्रारदार कुटुंबासह राहतात. सय्यद यांनी तक्रारदार महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यामध्ये त्यांच्यासह त्यांची बहीण, मैत्रिणीचे फोटो अपलोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच खात्यावरून त्यांच्या नातेवाइकांनाही रिक्वेस्ट पाठविली. यात सय्यदचाच हात असल्याचा संशय त्यांना आहे. त्यांनी रविवारी त्यांनी निर्मलनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 05:34 IST