मुंबई : सुखविंद कौर उर्फ राधे माँ हिच्या विरोधात गेल्या वर्षी विमानात त्रिशूळ नेल्याबद्दल अंधेरी एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरटीआय कार्यकर्ते आसद पटेल यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार, अंधेरीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल यांनी पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेरीस १३ आॅगस्ट, २०१५ रोजी त्यांनी कायदेशीर नोटीस पाठविली व दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
राधे माँ विरोधात गुन्हा दाखल
By admin | Updated: March 30, 2016 01:07 IST