नवी मुंबई : सिडकोने बांधलेल्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. इमारतींच्या छतांचे प्लास्टर कोसळू लागले आहे. या इमारतींमध्ये अपघात झाल्यास सिडको, नगरविकास विभाग व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी लक्षवेधी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने महासभेत मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत नखाते यांनी ही लक्षवेधी मांडली. महापालिका क्षेत्रत असलेल्या सिडको निर्मित इमारती जीर्ण झाल्या असून तेथे सातत्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अद्यापर्पयत घडलेल्या अशा दुर्घटनांमध्ये अनेकजण जखमी झालेले आहेत. मोडकळीस आलेल्या या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची भविष्यात जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे. परंतु सिडको प्रशासन व नगरविकास खाते अद्याप ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे नगरसेवक भरत नखाते यांचे म्हणणो आहे. त्यामुळे अशा दुर्घटनांना सिडको व नगरविकास खाते यांना जबाबदार धरले जावे व त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे अशी लक्षवेधी त्यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत मांडली. महापालिका क्षेत्रतली ही बाब असल्याने पालिकेमार्फत हे गुन्हे दाखल व्हावे, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. चर्चेदरम्यान नवी मुंबईकरिता वाढीव एफएसआयचा निर्णय निकाली काढण्यास मुख्यमंत्री विलंब करत असल्याची टीका सत्ताधारी नगरसेवकांनी केली. यावेळी सिडकोने मंजूर केलेला तीन एफएसआय हा विकासासाठी योग्य असल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी सांगितले. तसेच महापालिकेने निधी उपलब्ध करून त्याद्वारे प्रत्येक प्रभागातील जीर्ण इमारतींची डागडुजी करुण घेणो गरजेचे असल्याची सूचनाही त्यांनी मांडली.पालिकेच्या अडीच एफएसआयमध्ये खो घालण्यासाठीच सिडकोने तीन एफएसआयचा निर्णय करून द्विधा मन:स्थिती निर्माण केल्याचे मत नगरसेवक राजू शिंदे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सिडकोनिर्मित जुन्या सर्व इमारती धोकादायक घोषित कराव्यात व तेथे घडणा:या दुर्घटनाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना महापौर सागर नाईक यांनी आयुक्तांना दिल्या. हे गुन्हे दाखल करण्याकरिता कायदेशीर बाबी तपासण्याकरिता एक समिती गठीत केली जाईल असेही त्यांनी सभागृहात सांगितले. सभेच्या सुरवातीला शिवसेनेचे नगरसेवक मनोद हळदणकर व काँग्रेसचे दशरथ भगत यांनीही लक्षवेधी मांडली होती. परंतु महापौर सागर नाईक यांनी त्या नाकारल्याने विरोधकांनी महापौरांना घेराव घातला. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विरोधकांनी सभागृहात सत्ताधा:यांचा निषेध व्यक्त केला. तर सत्ताधा:यांना लक्षवेधी मांडावी लागत असल्याची खंत शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली.