Join us  

कोरोनाविरोधी लढा आयटीसी वापरणार १५० कोटींचा आपत्कालीन निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 8:12 PM

ज्येष्ठ नागरीक ,लहान मुलांना महिनाभर अन्न पुरवठा करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये अनेक मुले ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत.त्यापार्श्वभूमीवर  कोरोनाविरोधी लढ्यासाठी आयटीसी आपत्कालीन निधीचा वापर करणार आहे. या अंतर्गत आशीर्वाद बॉक्स ऑफ होप आणि सनफिस्ट बॉक्स ऑफ हॅपिनेस या माध्यमातून देशभर अन्नपुरवठा करण्यात येत आहे. 

लॉकडाऊनमुळे गरीब ,गरजूंवर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आयटीसी  चिल्ड्रन राइट्स अँड यू (क्राय), सॉस चिल्ड्रन्स व्हिलेज इंडिया आणि एका प्रतिष्ठीत स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलं व ज्येष्ठ नागरिकांना एक महिन्याचा अन्नपुरवठा करण्यात आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्यांद्वारे १ एप्रिल  पासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबवताना आवश्यक आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.

याबाबत आयटीसीचे प्रवक्ते  म्हणाले, “ग्राहक लॉकडाऊनमध्ये सहानुभूतीने आणि खंबीरतेने या देशभरात पसरलेल्या कोरोनाशी लढा देत आहेत. पण या लॉकडाऊनमध्ये मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे आणि त्यांना या कठीण परिस्थितीत अतिरिक्त मदत आणि सहकार्याची आवश्यकता आहे. आयटीसी अर्थपूर्ण सामाजिक योगदान देण्यासाठी कटिबद्ध असून स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अन्नपुरवठा करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आशीर्वाद बॉक्स ऑफ होपमध्ये आशीर्वाद आटा, मीठ आणि मूलभूत मसाले आहेत. मुलांसाठी असलेल्या सनफिस्ट बॉक्स ऑफ हॅपीनेसमध्ये सनफिस्ट बिस्किटांचे अनेक पुडे, यिप्पी! नूडल्स, जेलिमल्स, बी नॅचरल ज्युसेस आणि बिंगो! चे स्नॅक्स असतील असणार आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस