Join us

पन्नास हजार वाहनांना जागा हवी

By admin | Updated: November 27, 2014 01:08 IST

नो पार्किगच्या जागेत उभ्या राहणा:या वाहनांवरही वाहतूक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात कारवाई केली जात़े यामुळे वाहनचालकांकडूनच नाराजीचा सूर लावला जातो.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पार्किगची समस्या गंभीर बनत असून, यावरून अनेक वाद होताना दिसतात. त्याचप्रमाणो पार्किगसाठी जागा नसल्याने नो पार्किगच्या जागेत उभ्या राहणा:या वाहनांवरही वाहतूक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात कारवाई केली जात़े यामुळे वाहनचालकांकडूनच नाराजीचा सूर लावला जातो. एकूणच पार्किगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, दिवसाला 50 हजार वाहनांसाठी पार्किगची जागा हवी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी मुंबई पालिकेला सादर केला आहे. 
शहर आणि उपनगरांत पार्किगची जागा उपलब्ध नसून, त्यामुळे वाहन चालकांबरोबरच वाहतूक पोलिसांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सोसायटय़ा तसेच सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या आवारातही आता पार्किगसाठी जागा नसल्याने येथील वाहनेही नो पार्किगच्या जागेत उभी करीत आहेत. त्यावर कारवाई केली जात असतानाच वाहतूक पोलिसांना चालकांच्या रुद्रावतारालाच सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता पार्किगची समस्या खूपच गंभीर बनत चालल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात नो पार्किगमध्ये उभ्या केलेल्या 4 लाख 23 हजार 760 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून  3 कोटी 79 लाख 36 हजार 400 रुपये वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत. मागील वर्षीही याच काळात एवढय़ाच प्रमाणात कारवाई झाल्याचे पोलीस सांगतात. ही कारवाई पाहता प्रत्येक महिन्याला 40 हजार ते 50 हजार वाहनांवर नो पार्किगची कारवाई केली जाते. त्यामुळे हे प्रमाण पाहून दिवसाला 50 हजार वाहनांसाठी पार्किगसाठी जागा हवी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी बनविला असून तो पालिकेकडे सादर केला आहे. (प्रतिनिधी)
 
महिनाकेसेसदंड (रु़)
जानेवारी42,12137,25,300
फेब्रुवारी39,30634,54,800
मार्च47,73541,88,300
एप्रिल45,59540,31,800
मे46,12241,35,400
जून43,38138,95,200
जुलै41,25036,57,700
ऑगस्ट43,31837,76,200
सप्टेंबर40,19835,98,300
ऑक्टोबर34,73434,73,400
 
याबाबत सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले की, 50 हजार वाहनांसाठी पार्किग हवी आहे. तसा प्रस्तावही पालिकेला एक महिन्यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. त्यावर विचारही केला जात आहे.  
 
सध्या मुंबई शहर आणि उपनगरांत 200 छोटी-मोठी मैदाने असून, यामध्ये काही पालिकेची मैदाने आहेत. त्यामुळे पार्किगसाठी ही मैदाने उपलब्ध केल्यास सगळे प्रश्न सुटू शकतात, अशी शक्यता वाहतूक पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे.