Join us

अंतिम यादीतही एफवायचे प्रवेश कट आॅफ जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 04:30 IST

एफवाय प्रवेशाच्या तिसऱ्या यादीचा कटआॅफही चढाच राहिल्याचे बुधवारी पाहायला मिळाले.

मुंबई : एफवाय प्रवेशाच्या तिसऱ्या यादीचा कटआॅफही चढाच राहिल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. सेल्फ फायनान्स नव्वदीपारच असल्याचे चित्र होते. नामांकित महाविद्यालयांच्या दुसºया आणि तिसºया यादीत फारसा फरक दिसला नाही. दुसºया यादीनंतरही अनेक अभ्यासक्रमांसाठी कटआॅफ ९० टक्क्यांवर होता. नामांकित कॉलेजमध्ये तो ९२ ते ९३ टक्क्यांच्या घरात होता.तिसºया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येतील. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाचे संकेतस्थळ अर्ज भरण्यासाठी खुले राहील.