मोहोपाडा : रसायनीजवळील सावळे येथील हळदी समारंभात झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावळे गावात केदारी यांच्याकडे हळदी समारंभाचा कार्यक्र म होता. याकरिता सचिन कुरंगळे (३५) याला त्याचा मित्र प्रफुल्ल केदारी याच्याकडून निमंत्रण असल्याने तो प्रफुल्लच्या बहिणीच्या हळदीला आला होता. मंडपात सर्व जण गाण्याच्या तालावर नाचत होते. यावेळी अचानक स्पीकर बंद करण्यात आला. सचिन कुरंगळे याने स्पीकर चालू करण्याची मागणी केली. या गोष्टीचा रमेश तांडेल, संकेत केदारी, किरण केदारी, दत्तात्रेय गडगे,भूषण गडगे, मुन्ना तांडेल, विशाल केदारी व रमेश केदारी यांना राग आला. त्यांनी सचिन कुरंगळे व हरेश माळी यांच्या डोक्यावर काठीने वार केला तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केला. सदर प्रकाराबाबत सचिन कुरंगळे याने रसायनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून रसायनी पोलिसांनी आठ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. हळदी समारंभात मद्यपान करून हाणामारी होण्याची प्रकार वाढल्याने अनेक गावांनी हे समारंभ थाटामाटात करण्यावर बंदी घातली आहे. यावर नाहक पैसा खर्च होत असल्याने अनेक ग्रामपंचायतीनी ग्रामसभेत बंदीचा ठरावही मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसात रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने या समारंभावर बंदी घातली असली तरी आजही काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हे समारंभ साजरे होत आहेत. (वार्ताहर) च्नेरळ : ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामाचे बिल ठेकेदाराला देण्याच्या विषयावरून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यामध्ये ग्रामसेवक जखमी झाले. ही घटना शुक्रवारी नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायतीत घडली.च्कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल देण्यावरून हा वाद मारामारीपर्यंत गेला. ग्रामसेवक संभाजी केंद्रे यांनी ठेकेदाराला चेकमार्फत शुक्रवारी त्यांच्या कामाचे पैसे देण्याचे ठरले होते. मात्र ग्रामपंचायत निरीक्षक सुनील अहिरे यांनी त्या चेकवर सही करण्यात टाळाटाळ करून केंद्रे यांना शिवीगाळ करत ग्रामपंचायतीबाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या नाकाला जबर मार बसून ते जखमी झाले. मात्र आपण मारहाण केली नसल्याचे निरीक्षक अहिरे सांगत आहेत.च्प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा प्रकारची मारहाण शोभत नसल्याचे सांगून या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हारे ग्रामस्थांनी केली.
सावळे गावात हळदी समारंभात मारामारी
By admin | Updated: May 29, 2015 23:16 IST