Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या मुलीला पाजले फिनेल

By admin | Updated: January 26, 2017 03:49 IST

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या मुलीला फिनेल पाजल्याची घटना मंगळवारी विक्रोळीत घडली. स्थानिकांच्या मदतीने मुलीला तत्काळ

मुंबई : अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या मुलीला फिनेल पाजल्याची घटना मंगळवारी विक्रोळीत घडली. स्थानिकांच्या मदतीने मुलीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सन्यासी बेहरा (४१) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर परिसरात तक्रारदार १२ वर्षांची मुलगी आई, वडील आणि भावंडासोबत राहाते. त्याच परिसरात बेहरा राहण्यास आहे. मुलीच्या आईसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या भांडणाच्या रागात सन्यासीने महिलेच्या मुलीला फिनेल पाजले. मुलीच्या ओरडण्याने आईसह स्थानिकांनी तिच्याकडे धाव घेतली. सन्यासीला बेदम चोप देत, पोलिसांच्या हवाली केले. मात्र, मुलीची आई तक्रारीसाठी पुढे येत नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांना अडचण निर्माण झाली होती. महिला तक्रारीसाठी पुढे येताच, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी दिली. (प्रतिनिधी)