Join us

फेरीवाले मस्त प्रवासी त्रस्त

By admin | Updated: September 14, 2014 23:35 IST

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील फेरीवाले बोलतात ‘ आता माझी सटकली ‘ बघतो पालिका कशी कारवाई करते असे म्हणत फेरीवाल्यांनी पुन्हा कल्याण रेल्वे परिसरात आण सॅटीसवर बस्तान माडले

उमेश जाधव, टिटवाळाकल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील फेरीवाले बोलतात ‘ आता माझी सटकली ‘ बघतो पालिका कशी कारवाई करते असे म्हणत फेरीवाल्यांनी पुन्हा कल्याण रेल्वे परिसरात आण सॅटीसवर बस्तान माडले असून त्यांच्या विरोधात आता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आाणि पालिका आयुक्तांनाकडे निवेदन देऊन फेरीवाला, भिकारी, गर्दुल्ले, यांचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा कल्याण नागरी समस्या निवारण समितीने दिला आहे. एमएमआरडीने करोडो रुपये खर्च करून नागरिकांनासाठी बांधलेल्या सॅटीसवर फेरीवाल्यांनी उच्छाद मांडल्याने एमएमआरडीचे भूत पालिकेच्या मानगुटीवर बसून कल्याणकरांना छळत असल्याचे दिसून येत असून फेरीवाला मस्त आणि पालिका त्रस्त झाल्याची चर्चा रंगली आहे. फेरीवाले यांच्या बाबत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन गांभीर्याने कारवाई करीत नसल्याचे दिसून येत असून महापालिकेचे फेरीवाला हटाव पथक आणि फेरीवाल्यांची अर्थपूर्ण व्यावहारीक अभद्र युतीमुळे दिवसेंदिवस फेरीवाला, भिकारी, गर्दुल्ले, यांना कसलीच भीती उरली नसल्याचे निवेदनात नमूद केले असून या फेरीवाल्यांना पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, आणि काही रेल्वेचे अधिकारी यांच्या आशीर्वादाने कल्याण रेल्वे परिसरात आणि सॅटीसवर बिनधास्तपणे दुकाने थाटून बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एखाद्या दिवशी या सर्व प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे नागरिकांच्या सोयी व सुरक्षेसाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि पालिका आयुक्तांना फेरीवाला, भिकारी, गर्दुल्ले, यांचा कायमचा बंदोबस्त करा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा कल्याण नागरी समस्या निवारण समितीने दिला आहे.