Join us
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल राहुल आवारेचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 06:16 IST

आॅस्ट्रेलियामधील गोल्डकोस्टमध्ये नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारेचा महाराष्ट्र दिनी शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.

मुंबई : आॅस्ट्रेलियामधील गोल्डकोस्टमध्ये नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारेचा महाराष्ट्र दिनी शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. राहुल आवारेने मंगळवारी महाराष्ट्र दिनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी शिवसेनेकडून आवारेचा खास सत्कार करण्यात आला आणि त्याच्या कामगिरीबद्दल १० लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल आवारेला या वेळी १० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.२१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. सुवर्णपदक मिळवून राहुल भारतात परतल्यानंतर, त्याच्यावर विविध स्तरातून बक्षिसांचा वर्षाव होतो आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सत्कार झाला. त्या वेळी राहुलला पवार यांनी १२ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल आवारे डीवायएसपी होणार हे याआधीच जाहीर केले आहे.