Join us

तणातणी, तक्रारी आणि तणाव

By admin | Updated: April 23, 2015 06:23 IST

बुधवारी झालेल्या मतदानात अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात केल्या जाणा-या

नवी मुंबई : बुधवारी झालेल्या मतदानात अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे अनेक प्रभागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत काही प्रकरणे वगळता इतर प्रकरणांची तक्रार पोलिसांकडे झालेली नव्हती. अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालीमुळे ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक उमेदवाराचे राजकीय भवितव्य टांगणीला असल्याने विजय मिळवण्यासाठी त्यांच्याकडून मतदारराजाला साकडे घालण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू होते. त्यातूनच घडलेल्या वादाच्या सात तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहे. (प्रतिनिधी)