Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भटक्या श्वानाला अन्न, निवारा देऊन आपलेसे करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:24 IST

काळाचौकीतील क्षीरसागर कुटुंबीयांचा उपक्रम: द्वेष, चर्चा करण्यापेक्षा कृती करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबईतील धकाधकीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही, तर प्राण्यांकडे कोण लक्ष देतो. काळाचौकीतील क्षीरसागर कुटुंबीय हे पाळीव व भटक्या श्वानांवर अपार प्रेम करतात. परिसरामध्ये त्यांच्या प्राणिप्रेमाविषयीच्या चर्चा केल्या जातात. सोनल क्षीरसागर या व्यवसायाने एका फार्मा कंपनीमध्ये बिझनेस मॅनेजर आहेत. सोनल यांच्याकडे ‘टूटू’ आणि ‘सॉफ्टी’ हे दोन नर श्वान असून, ते सख्खे भाऊ आहेत. सॉफ्टीला दिसत नाही. दोन्ही श्वानांवर हे कुटुंबीय जीवापाड प्रेम करतात आणि पोटच्या मुलांप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते.या दोन्ही श्वानांना दिवसातून तीनदा जेवण दिले जाते. दोन वेळा फिरविण्यासाठी नेले जाते. घरच्या श्वानांप्रमाणेच भटक्या श्वानांचीसुद्धा ते काळजी घेतात. घराजवळील परिसरात पाच ते सहा श्वान आहेत, त्यांना रोज रात्रीच्या वेळी जेवण दिले जाते. एका मादी श्वानाला चार पिल्ले झाली असून, त्यांच्यासाठी छोटेखानी घरदेखील बांधले आहे. माणसाला एखाद्या गोष्टीची गरज भासली, तर ते बोलू शकतात. मात्र, प्राणी बोलू शकत नाहीत. प्राण्यांकडे सहसा जास्त कोणी लक्ष देत नाहीत, अशी माहिती प्राणिप्रेमी सोनल क्षीरसागर यांनी दिली.मला कुठेही मरण पावलेला प्राणी किंवा पक्षी आढळला, तर त्यांना तिथून घेऊन जाऊन दफन करून येते. श्वान असेल, तर परळ येथील बैल-घोडा रुग्णालयात जाऊन त्यांना अग्नी देते. सध्या समाजामध्ये लोकांच्या मनात प्राण्यांविषयी खूप द्वेष निर्माण झाला आहे.प्राण्यांसाठी जे लोक काम करतात, त्यांच्यावर सतत हे लोक टीका करतात. त्यामुळे अशा लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असेही भाष्य सोनल यांनी केले.भटक्या श्वानांसाठी मायलेकी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतातआमच्या घरचे सगळेच प्राणिप्रेमी आहेत. भटक्या श्वानांना खायला घालण्यासाठी दोघीही रात्री एक वाजता घराबाहेर निघतो. ही वेळ जास्त रहदारीची नसते आणि इतर लोकही आपल्या कामात अडथळा निर्माण करत नाहीत. दर बुधवारी व रविवारीभटक्या श्वानांना खाद्य देतात़