Join us  

मुंबईतील २७ हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:28 AM

हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, कच्चा माल, तसेच तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता अशा विविध पातळ्यांवर अन्न व औषध प्रशासनतर्फे तपासणी करून राज्यभर कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई : हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, कच्चा माल, तसेच तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता अशा विविध पातळ्यांवर अन्न व औषध प्रशासनतर्फे तपासणी करून राज्यभर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत मुंबईतील २७ हॉटेल्सनाएफडीएने नोटीस पाठविली. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेले निकषांचे पालन न केल्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले.पंचतारांकित हॉटेलमधील अन्नाचा दर्जा कसा असावा, अन्न शिजविताना कोणते निकष पाळावेत, याची नियमावली प्रशासनाने दिली आहे. यात कच्चा माल साठवण्याची पद्धत, तेल-तूप आणि जिन्नसाची कालमर्यादा, स्वयंपाकघर स्वच्छता अशा अनेक घटकांचा समावेश आहे. वेळोवेळी हॉटेल्सना या संदर्भात निर्देश देऊनही सुधारणा न झाल्याने एफडीए नोटीस पाठवते.प्रशासनाने २७ हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केल आहेत. हॉटेलमध्ये स्वच्छताविषयक तरतुदींची सुधारणा न झाल्यास पुन्हा फेरतपासणी होते. त्यातही सुधारणा न झाल्यास परवाने रद्द केले जातात. यात अपीलाचीही संधी मिळते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

टॅग्स :हॉटेलएफडीए